Bhaichung Bhutia: टीम इंडियाच्या माजी कर्णधाराचा पुन्हा पराभव

आशुतोष मसगौंडे

लोकसभा विधानसभा एकत्र

लोकसभा निवडणुकीबरोबर सिक्कममध्ये विधानसभेच्या निवडणुकाही पार पडल्या. याचा निकाल आज लागला.

Bhaichung Bhutia | Esakal

माजी कर्णधार

सिक्कीमच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार भायचंग भुतिया नशिब आजमावत होता.

Bhaichung Bhutia | Esakal

बारफुंग विधानसभा

भारताचा माजी फुटबॉल कर्णधार आणि SDF उमेदवार बाईचुंग भुतियाचा बारफुंग विधानसभा जागेवर सुमारे 3 हजार मतांनी परभाव झाला.

Bhaichung Bhutia | Esakal

राजकीय पक्ष

माजी स्टार फुटबॉलपटूने 2023 मध्ये SDF मध्ये विलीन होण्यापूर्वी 2018 मध्ये स्वतःचा पक्ष -- हमरो सिक्कीम पार्टी स्थापन केला होता. भुतिया सध्या SDF चा उपाध्यक्ष आहे.

Bhaichung Bhutia | Esakal

राजकारणात प्रवेश

माजी फुटबॉलपटूने पश्चिम बंगालमधून तृणमूलचा उमेदवार म्हणून 2014 आणि 2016 अशी दोनदा निवडणूक लढवली होती. मात्र, दोन्ही वेळा तो पराभूत झाला.

Bhaichung Bhutia | Esakal

पराभव, पराभव, पराभव

पश्चिम बंगालमध्ये यश न आल्याने भुतियाने 2019 मध्ये एक लोकसभा आणि लोकसभेची एक पोटनिवडणूक लढली व येथेही तो पराभूत झाला.

Bhaichung Bhutia | Esakal

146 उमेदवार मैदानात

32 सदस्यीय सिक्किम विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 146 उमेदवार निवडणूक मैदानात आहेत.

Bhaichung Bhutia | Esakal

एकाच वेळी मतदान

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी सिक्कीममधील 32 विधानसभा जागांसाठी एकाच वेळी मतदान झाले होते.

Bhaichung Bhutia | Esakal

पारंपरिक पोशाख अन् घायाळ करणारी नजर..; 'या' अभिनेत्रीच्या मादक अदांवर चाहते फिदा

Actress Sanya Malhotra