Shubham Banubakode
रॉ चे एक माजी एजंट सध्या चांगलाच चर्चेत आहेत.
भारताच्या गुप्तचर संस्थेतून निवृत्त झाल्यानंतर ते आता चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत.
लकी बिश्त असं या एंजटचं नाव आहे.
त्यांचे काही चित्रपट आणि वेब सिरीज लवकरच प्रदर्शित होणार आहेत.
लकी बिश्त यांनी एका मुलाखतीत त्यांच्या चित्रपटसृष्टीतील पदार्पण आणि करिअरविषयी माहिती दिली आहे.
लकी बिश्त हे गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत तैनात होते.
ते म्हणाले, मी ९० दिवस नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत तैनात होतो, यादरम्यान, त्यांनी एकही सुट्टी घेतली नव्हती. ते समर्पित नेते आहेत.
लकी बिश्त हे मूळ उत्तरांखंडचे आहेत. त्यांनी काही वर्षांपूर्वी रॉमधून निवृत्ती घेतली.
लकी बिश्त यांच्या कारकीर्दीवर एस. हुसैन जैदी यांनी पुस्तकही लिहिलंयं.
"RAW Hitman: The Assassinations" असं या पुस्तकाचं नाव आहे.