विनाकारण तोंडात लाळ जमा होतेय? दुर्लक्ष करू नका!

Aarti Badade

सतत तोंडाला पाणी सुटतंय?

तोंडात नेहमीपेक्षा जास्त लाळ तयार होणे किंवा लाळ गळणे याला वैद्यकीय भाषेत हायपरसॅलिव्हेशन किंवा सियालोरिया म्हणतात.

Excessive Salivation

|

Sakal

ॲसिडिटीमुळेही वाढू शकते लाळ!

पोटातील आम्ल अन्ननलिकेत वर आल्यास शरीर त्याचा परिणाम कमी करण्यासाठी जास्त लाळ तयार करू शकते, ज्यामुळे तोंडात आंबट पाणी येते.

Excessive Salivation

|

Sakal

तोंडातील संसर्गही असू शकतो कारण!

तोंडातील अल्सर, हिरड्यांची सूज, दातदुखी किंवा घशाचा संसर्ग यांमुळे लाळेचे प्रमाण वाढू शकते.

Excessive Salivation

|

Sakal

औषधं आणि गर्भधारणेचाही परिणाम!

काही औषधांचे दुष्परिणाम, गर्भधारणेदरम्यान होणारे हार्मोनल बदल आणि मळमळ यांमुळे काही व्यक्तींना जास्त लाळ सुटू शकते.

Excessive Salivation

|

Sakal

खाण्याच्या सवयींमुळेही वाढते लाळ!

अतितिखट, आंबट किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्याने लाळ ग्रंथी सक्रिय होतात आणि तोंडात लाळेचे प्रमाण तात्पुरते वाढू शकते.

Excessive Salivation

|

Sakal

मज्जासंस्थेच्या समस्यांशीही संबंध!

स्ट्रोक किंवा पार्किन्सन्ससारख्या आजारांमध्ये लाळ गिळण्याची क्षमता कमी होऊ शकते, त्यामुळे तोंडात लाळ साचून बाहेर गळू शकते.

Excessive Salivation

|

Sakal

'ही' लक्षणं दिसल्यास डॉक्टरांना भेटा!

लाळ गिळताना त्रास, ठसका, बोलण्यात अडचण किंवा चेहऱ्याच्या स्नायूंमध्ये अचानक कमकुवतपणा जाणवल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्या.

Excessive Salivation

|

Sakal

रोज 10 हजार पावले चालणं आवश्यक आहे का? WHO काय सांगते?

walk

|

Sakal

येथे क्लिक करा.