हाय बीपी असलेल्यांनी ‘हे’ व्यायाम चुकूनही करू नयेत!

Aarti Badade

'सायलेंट किलर' उच्च रक्तदाब

उच्च रक्तदाब हा अनेकदा कोणतीही लक्षणे न दाखवता शरीराला हानी पोहोचवतो, म्हणूनच याला 'सायलेंट किलर' म्हणतात. जगभरातील अब्जावधी लोक या समस्येने त्रस्त आहेत.

Exercises to avoid with high blood pressure

|

sakal

व्यायाम करावा की करू नये?

अनेकांना वाटते की हाय बीपी असल्यास व्यायाम करू नये, परंतु तज्ज्ञांच्या मते नियमित आणि योग्य शारीरिक व्यायामामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास उलट मदतच होते.

Exercises to avoid with high blood pressure

|

Sakal

जड वजन उचलणे टाळा

उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी किंवा हृदयविकार असलेल्यांनी जड वजन उचलणे टाळावे. क्षमतेपेक्षा ७५ टक्क्यांहून अधिक वजन उचलल्याने हृदयावर आणि शरीरावर तीव्र ताण येऊ शकतो.

Exercises to avoid with high blood pressure

|

Sakal

हेवी स्क्वॅट्स आणि डेडलिफ्ट

डेडलिफ्ट, हेवी स्क्वॅट्स किंवा हाय-इंटेन्सिटी बेंच प्रेस करताना अनेकदा श्वास रोखून धरला जातो. यामुळे रक्तातील दाब झपाट्याने वाढतो आणि चक्कर येणे किंवा छातीत दाब जाणवण्याचा धोका वाढतो.

Exercises to avoid with high blood pressure

|

Sakal

हाय-इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग

तीव्र वेगाने आणि कमी वेळात केला जाणारा व्यायाम (HIIT) सर्वांसाठी सुरक्षित नाही. ज्यांनी नुकतीच फिटनेसची सुरुवात केली आहे किंवा जे आधीच हाय बीपी आणि मानसिक तणावाखाली आहेत, त्यांनी 'HIIT' टाळलेलेच बरे.

Exercises to avoid with high blood pressure

|

Sakal

पुश-अप्स आणि दोरीवरच्या उड्या

सतत आणि जास्त जोर लावावा लागणारे पुश-अप्स किंवा वेगाने दोरीवरच्या उड्या मारणे यांसारख्या व्यायामांमुळेही ब्लड प्रेशर अचानक वाढू शकतो. त्यामुळे असे व्यायाम डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावेत.

Exercises to avoid with high blood pressure

|

Sakal

आरोग्याचा सुवर्ण नियम

व्यायाम करताना किंवा केल्यानंतर तुम्हाला जरासा जरी त्रास, छातीत अस्वस्थता किंवा चक्कर आल्यासारखे वाटले, तर व्यायाम ताबडतोब थांबवून डॉक्टरांची मदत घ्या.

Exercises to avoid with high blood pressure

|

Sakal

चपाती भाजताना ही एक चूक करू नका! यामुळे वाढू शकतो कॅन्सरचा धोका!

Roasting roti on direct gas flame

|

Sakal

येथे क्लिक करा