Aarti Badade
सकाळी लवकर किंवा सूर्यास्तानंतर व्यायाम करणे सर्वोत्तम; सकाळी 10 ते दुपारी 3 दरम्यान टाळा.
गडद रंग उष्णता शोषतात, त्यामुळे हलके रंग आणि सैल कपडे वापरा.
कमीत कमी 2-3 लिटर पाणी दिवसातून प्या. व्यायाम करताना पाण्याची बाटली जवळ ठेवा.
घामामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स बाहेर पडतात. लिंबूपाणी, ताक, नारळपाणी, भाज्यांचे सूप यांचा समावेश करा. यामुळे उष्मघाताचा त्रास कमी होतो.
सनग्लासेस वापरा आणि SPF 30+ असलेले सनस्क्रीन लावा.
संत्री, काकडी, टरबूज, टोमॅटो, ताक, दही यांचा आहारात समावेश करा.
मसालेदार, तळलेले, साखरयुक्त पेये आणि अल्कोहोल टाळा – हे डिहायड्रेशन वाढवतात.
दर २-३ तासांनी थोडे थोडे जेवण घ्या; वाफवलेले पदार्थ अधिक चांगले.