यंदाच्या उन्हाळ्यात जोडीदारासोबत ८ रोमँटिक परदेशी डेस्टिनेशन्सचा अनुभव घ्या!

Monika Shinde

उन्हाळा सुट्टी

उन्हाळा सुट्टी म्हणजे मस्ती आणि मजा! जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कमी बजेटमध्ये परदेशात फिरायचं प्लॅन करत आहे.

बजेट

तर फक्त ९९,९९९ रुपयांमध्ये तुम्ही या ८ परदेशी ठिकाणांचा अनुभव घेऊ शकता.

थायलंड

थायलंडमध्ये सुंदर बीचेस, मजेदार नाइटलाइफ आणि स्वादिष्ट स्ट्रीट फूड आहे. तुम्ही फुकेत, क्राबी, किंवा कोह समुईमध्ये आराम करू शकता.

वियेतनाम

इतिहास प्रेमीसाठी उत्तम ठिकाण आहे. हॅलॉन्ग बेच्या जादुई क्रूझमधून फिरा. हॅनोई किंवा हो ची मिन्ह सिटीमधील कॅफे संस्कृतीचा आनंद घ्या.

बाली, इंडोनेशिया

हनीमूनसाठी बेस्ट ठिकाण आहे. येथे सुंदर धबधबे, खास व्हिलाज आणि पूल, आणि उबूडमध्ये तांदळाच्या शेतांवर फेरफटका मारू शकता.

श्रीलंका

श्रीलंका एक छोटी फ्लाइट अंतरावर स्थित आहे. येथे तुम्ही सुंदर समुद्रकिनारे, चहा बागा, प्राचीन अवशेष आणि सिगिरियाचे आश्चर्यकारक दृश्य पाहू शकतात.

दुबई

जर तुमचे बजेट कमी असेल, तर दुबई हे उत्तम ठिकाण आहे. येथे तुम्ही बुर्ज खलीफाच्या खाली जेवण, वाळवंटी सफारी, दुबई मॉलमधून शॉपिंग आणि जुमेरिया बीचवर आराम करू शकता.

कंबोडिया

अंगकोर वटच्या सुर्योदयाचा अनुभव घेणे आवश्यक आहे. तसेच कोह रोंग, बॅटामबँग आणि नोम पेन्हमधील बाजारपेठ मध्ये शॉपिंग करू शकता.

लाओस

लाओस एक शांतीपूर्ण ठिकाण आहे. लुआंग प्रबांगच्या UNESCO विश्व धरोहर शहराचा अनुभव घ्या, कुआंग सी धबधब्यांना पाहू शकता.

नेपाळ

पोखराच्या शांत सरोवरांमध्ये विश्रांती घ्या, अन्नपूर्णा पर्वताच्या ट्रेकचा आनंद घ्या आणि काठमांडूच्या ऐतिहासिक गल्ल्यांमध्ये फेरफटका मारा.

होळी खेळण्यापूर्वी लावा 'ही' गोष्ट, त्वचा आणि केस राहतील सुरक्षित!

येथे क्लिक करा...