Anushka Tapshalkar
महाराष्ट्रात प्रत्येक सणासुदीला, देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी खास पुरणपोळी बनवली जाते. काही ठिकाणी गुळाची तर काही ठिकाणी सारखेची; पण भारतभर हीच पुरणपोळी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. चला जाणून घेऊया.
गव्हाच्या कणकेपासून आणि हरभरा डाळीपासून तयार केलेल्या पुरण, गुल आणि वेलदोड्याच्या चवीने परिपूर्ण ही पारंपरिक पद्धतीने बनवलेली पुरणपोळी तुपासोबत खाल्ल्यास अधिक स्वादिष्ट लागते. महाराष्ट्रात सगळ्या घरांमध्ये ही बनवली जाते.
या पुरणपोळीत चण्याच्या डाळीसोबत तांदूळही वापरला जातो, त्यामुळे ती हलकी लागते. पिठीसाखर आणि जायफळाचा वापर केल्यामुळे तिचा गोडसर स्वाद अधिक खास होतो.
ही पोळी गूळ आणि साखरेच्या परफेक्ट बॅलन्समुळे खास पुणेरी चव घेऊन येते. मैदा आणि कणकेच्या मिश्रणामुळे ही पोळी अतिशय मऊ आणि सहज चावता येण्याजोगी असते.
तुरीच्या डाळीपासून बनणाऱ्या या पोळीत केशर आणि भरपूर ड्रायफ्रूट्स घालून तिचा शाही थाट वाढवला जातो. गोडसर आणि समृद्ध चव असलेली ही पुरणपोळी वेगळ्या प्रकारची खासियत जपते.
या पोळीत खोबऱ्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. साखरेच्या ऐवजी गूळ आणि ओल्या नारळाचा वापर असल्यामुळे ती नरम, ओलसर आणि अधिक स्वादिष्ट लागते.
गूळ, खवा आणि पिठीसाखर यांचे अनोखे मिश्रण ही पोळी अधिक लज्जतदार बनवते. मऊसर पोळी तुपात भाजून घेतल्याने तिच्या स्वादात भर पडते आणि प्रत्येक घासावर तोंडात गोडसरपणा पसरतो.
ही पोळी मुगलई थाटाची असून त्यात काजू, डेसिकेटेड खोबरे आणि केशराचा वापर केला जातो. ही पोळी गरमागरम दुधाच्या रबडीसोबत सर्व्ह केल्यास तिची चव अजूनच छान लागते.