रत्नागिरीतील नदीपात्रात असलेलं 'कर्णेश्वर शिवमंदिर'; जाणून घ्या इतिहास

Pranali Kodre

कसबा : ऐतिहासिक गाव

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कसबा हे ऐतिहासिक गाव आहे. या गावाला छत्रपती संभाजी महाराजांचा जसा इतिहास आहे, तसाच देवळांचाही.

Karneshwar Temple

|

Sakal

देवळांचे गाव

देवळांचे गाव अशी ओळख असलेल्या कसबामध्ये सुमारे ४०० देवळं होतं, असं म्हटलं जातं, पण सध्या ७० च्या आसपास देवळं उरली आहेत.

Karneshwar Temple

|

Sakal

कर्णेश्वर मंदिर

यातीलच एक प्रसिद्ध मंदिर म्हणजे कर्णेश्वर मंदिर, जे अजूनही सुस्थितीत असून शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. कर्णेश्वर मंदिर चालुक्यकालीन मंदिर आहे.

Karneshwar Temple

|

Sakal

नावामागील कारण

गुजरातचा चालुक्य राजा कर्ण येथे इसवी सन १०६४ सुमारास राज्य करत होता, त्याने या काळात एक शिममंदिर बांधले, जे त्याच्याच नावाने कर्णेश्वर शिवमंदिर म्हणून ओळखले जाते.

Karneshwar Temple

|

Sakal

भूमीज शैलीतील रचना

सुमारे ४०० चौ.मी क्षेत्रातील मंदिराच्या काळ्या पाषाणात कोरीव काम केलेलं आहे. भूमीज शैलीतील रचना या मंदिराची आहे.

Karneshwar Temple

|

Sakal

आख्यायिका

या मंदिराच्या अनेक आख्यायिकांपैकी एक म्हणजे पांडवांनी आज्ञातवासाच्या काळात एका रात्रीत हे मंदिर बांधले.

Karneshwar Temple

|

Sakal

संगम मंदिर म्हणूनही ओळख

नदीपात्रात हे देवालय असून अलकनंदा, वरुणा आणि शास्त्री या तीन नद्यांच्या पात्रात हे मंदिर असल्याने 'संगम मंदिर' म्हणूनही ओळखले जाते.

Karneshwar Temple

|

Sakal

कधी भेट द्याल?

नदीपात्रात मंदिर असल्याने पावसाळ्यात बंद असते. पण उन्हाळा आणि हिवाळ्यात हे मंदिर पर्यटकांना पाहाता येते.

Karneshwar Temple

|

Sakal

संगमेश्वरमध्ये निवासाची सोय

दरम्यान, जवळ फारशी निवासाची सोय नसल्याने पर्यटकांना राहण्यासाठी संगमेश्वरमध्ये पर्याय शोधावे लागतात.

Karneshwar Temple

|

Sakal

जवळचे स्थानके

कर्णेश्वर मंदिराकडे येण्यासाठी जवळचे बसस्थानक आणि रेल्वेस्थानक संगमेश्वर आहे.

Sangameshwar

|

Sakal

मिनी गोवा म्हणून ओळखले जाणारे रायगडमधील अलिबाग

Alibag

|

Sakal

येथे क्लिक करा