Pranali Kodre
कोकण म्हणजे निसर्गाचं वरदान लाभलेलं एक ठिकाण. येथे अनेक पर्यटनस्थळं असून यासाठी सिंधुदुर्ग जिल्हाही प्रसिद्ध आहे.
Kunkeshwar Temple in Sindhudurg
Sakal
याच सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यातील 'कोकणाची दक्षिण काशी' म्हणून ओळखले जाणारे श्रीक्षेत्र कुणकेश्वर मंदिर आहे. भगवान महादेवाचे जागृत स्थान म्हणूनही या मंदिराची ओळख आहे.
Kunkeshwar Temple in Sindhudurg
Sakal
या मंदिराची रचना, बांधकाम, निसर्गरम्य परिसर आणि मंदिराला लागून असलेला अथांग समुद्र हे दृष्य विलोभनीय आहे. मंदिराच्या तटावर आदळणाऱ्या समुद्राच्या लाटा मनाला भुरळ घालतात.
Kunkeshwar Temple in Sindhudurg
Sakal
पूर्वी मंदिराच्या बांधकामासाठी लाकूड आणि कौले वापरण्यात आली होती, पण जीर्णोद्धार करताना मंदिराच्या मूळ रचनेत बदल न करता अधुनिक साहित्य वापरून बांधकाम करण्यात आले आहे.
Kunkeshwar Temple in Sindhudurg
Sakal
या मंदिराच्या आवारात श्रीदेव गणपती, श्रीदेव भैरव, श्रीदेव मंडलिक, श्रीदेव नारायण आणि श्रीदेवी जोगेश्वरी यांचीही मंदिरं आहेत.
Kunkeshwar Temple in Sindhudurg
Sakal
कुणकेश्वर हे धार्मिक स्थळ असून येथील समुद्रकिनाराही पर्यटकांना आकर्षित करतो. येथे समुद्रस्नानाचाही आनंद घेता येतो.
Kunkeshwar Temple in Sindhudurg
Sakal
महाशिवरात्रीच्या दिवशी येथे मोठी यात्रा भरते, त्यावेळी येथे भाविकांची मोठी गर्दी असते. याशिवाय श्रावणी सोमवारीही भाविक मोठ्या प्रमाणात येतात.
Kunkeshwar Temple in Sindhudurg
Sakal
श्रीक्षेत्र कुणकेश्वरला जाण्यासाठी जवळचे रेल्वेस्थानक कणकवली आहे, तर बसस्थानक देवगड आहे. याशिवाय खाजगी वाहनानेही जाता येते. तसेच जवळचे विमानतळ सिंधुदुर्ग आणि गोवा आहे.
Kunkeshwar Temple in Sindhudurg
Sakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Sawantwadi, Konkan
Sakal