Pranali Kodre
कोकणातील निसर्गरम्य ठिकाणांपैकी एक ठिकाण म्हणजे सिंधुदुर्गमधील सावंतवाडी.
Sawantwadi, Konkan
सावंतवाडीचे मूळ नाव सुंदरवाडी असं आहे. पूर्वी सावंतवाडी संस्थानाचा कारभार चऱ्हाटे गावातून पाहिला जात होता. १६७० मध्ये खेम सावंत (दुसरे) यांनी हे शहर वसवले.
Sawantwadi, Konkan
X/maha_tourism
या शहराला सात वाड्या आहेत, ज्यात खासकील वाडा, सबनीस वाडा, माठे वाडा, सालई वाडा, भटवाडी, वैश्य वाडा आणि बाहेरचा वाडा हे मुख्य वाड्यांचा समावेश आहे.
Sawantwadi, Konkan
X/maha_tourism
शहराच्या मध्यभागी असलेला मोती तलाव, प्रसिद्ध गंजिफा, शिव उद्यान, लाकडी खेळणी कारखाना, शिल्पग्राम, विठ्ठल मंदिर आणि जैवविविधतेने नटलेला नरेंद्र डोंगर हे सावंतवाडीचे वैभव. याशिवाय अनेक छोटी-मोठी मंदिरं पर्यटकांना भूरळ पाडतात.
Sawantwadi, Konkan
Sakal
ताणतणावातून मुक्त होण्यासाठी हे अतिशय सुंदर शहर आहे. सावंतवाडी हे महाराष्ट्रातून गोव्याकडे जाताना शेवटच्या टप्प्यातील शहर आहे.
Sawantwadi, Konkan
Sakal
सावंतवाडीत उन्हाळ्यात रानमेवा आणि पावसाळा व हिवाळ्यामध्ये निसर्ग सौंदर्याचा अनुभव येथे घेता येतो.
Sawantwadi, Konkan
Sakal
डिसेंबरमध्ये तीन दिवसांचा सावंतवाडी मोहोत्सवही भरतो, या काळात कोकणी पदार्थांची रेलचेल असते. तसेच कोकणी सांस्कृतीक कलांचेही दर्शन घडते.
Sawantwadi, Konkan
X/maha_tourism
पुण्याहून ३७४ किलोमीटर आणि मुंबईहून ५१८ किलोमीटर अंतरावर हे शहर असून येथे रेल्वेस्थानक आणि बसस्थानकही आहे. तसेच सिंधुदुर्ग आणि गोवा हे जवळचे विमानतळं आहेत.
Sawantwadi, Konkan
Sakal
सावंतवाडीमध्ये पर्यटकांसाठी निवासासाठी उत्तम हॉटेल्स उपलब्ध असून मासेप्रेमींसाठी हे आवडीचं ठिकाण आहे.
Sawantwadi, Konkan
Sakal