Pranali Kodre
कोकणातील अनेक निसर्गरम्य ठिकाणांपैकी एक ठिकाण म्हणजे वेंगुर्ला. सिंधुदुर्ग जिह्यात असलेलं वेंगुर्ले हे समुद्रकिनारे, मंदिरे आणि किल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे.
वेंगुर्ल्यापासून जवळच रेडी गणपती मंदिर आहे. हे मंदिर प्राचीन वास्तुकलेसाठीही ओळखले जाते.
सागरेश्वर समुद्रकिनारा हे देखील वेंगुर्ल्यातील एक पर्यटन स्थळ असून येथे एक शिवमंदिरही आहे.
कोंडूरा समुद्रकिनारा हा पांढरी वाळू आणि शांत वातावणासाठी ओळखला जातो.
नारळाच्या झाडांनी वेढलेला शिरोडा बीचही निसर्गप्रेमींना आकर्षित करतो.
वेंगुर्ला लाईटहाऊस हे देखील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. येथून अरबी समुद्रचा आणि आजूबाजूचा परिसराता मनमोहक नजारा पाहायला मिळतो.
वेंगुर्ल्यात क्रॉफर्ड मार्केटही असून येथे अनेक अस्सल कोकणी पदार्थ मिळतात.
वेंगुर्ल्यात डच वखारही पाहायला मिळते.
वेंगुर्ल्यात श्री देवी सातेरी हे देखील एक प्रसिद्ध मंदिर आहे.