शिवरायांच्या स्वराज्यातील ऐतिहासिक रत्न; नक्की भेट द्या पुण्यातील 'या' किल्ल्याला!

Aarti Badade

पुण्याची ओळख - सिंहगड किल्ला

पुण्यातील डोणजे गावाजवळ सह्याद्रीच्या पर्वतरांगेत दिमाखात उभा असलेला हा किल्ला पूर्वी 'कोंढाणा' म्हणून ओळखला जायचा. हा किल्ला पुणेकरांचे आवडते पर्यटन स्थळ आहे.

Sinhagad Fort Pune

|

Sakal

तानाजी मालुसरे यांचा पराक्रम

हा किल्ला १६७० मध्ये झालेल्या ऐतिहासिक लढाईसाठी प्रसिद्ध आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या अतुलनीय शौर्यामुळे मराठ्यांनी हा गड पुन्हा जिंकला.

Sinhagad Fort Pune

|

Sakal

'आधी लगीन कोंढाण्याचे...'

आपल्या मुलाच्या (रायबाच्या) लग्नापेक्षा स्वराज्याला प्राधान्य देत, तानाजी मालुसरे यांनी "आधी लगीन कोंढाण्याचे, मग रायबाचे" असा ऐतिहासिक निश्चय केला होता.

Sinhagad Fort Pune

|

Sakal

गड आला पण सिंह गेला!

या लढाईत मराठ्यांचा विजय झाला, पण तानाजींना वीरमरण आले. ही वार्ता समजताच छत्रपती शिवाजी महाराजांनी "गड आला पण सिंह गेला" असे भावूक उद्गार काढले.

Sinhagad Fort Pune

|

Sakal

अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाची मेजवानी

सिंहगडावर गेल्यावर पर्यटक चुलीवरचे पिठलं-भाकरी, गरमागरम कांदाभजी, माठातील दही-ताक आणि खर्डा-ठेचा अशा अस्सल गावरान जेवणाचा मनसोक्त आनंद घेतात.

Sinhagad Fort Pune

|

Sakal

किल्ल्यावरील प्रेक्षणीय स्थळे

किल्ल्यावर नरवीर तानाजी मालुसरे यांचे स्मारक, राजाराम महाराजांची समाधी, लोकमान्य टिळकांचे निवासस्थान, कल्याण दरवाजा आणि पुणे दरवाजा या ऐतिहासिक वास्तू पाहण्यासारख्या आहेत.

Sinhagad Fort Pune

|

Sakal

पुण्यातील सर्वोत्तम ट्रेकिंग स्पॉट

सहलीसाठी आणि ट्रेकिंगसाठी सिंहगड हे एक भन्नाट ठिकाण आहे. निसर्गाच्या सानिध्यात आणि ऐतिहासिक वातावरणात वेळ घालवण्यासाठी उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात येथे नक्की भेट द्या.

Sinhagad Fort Pune

|

Sakal

सह्याद्रीचे सौंदर्य अन् मराठा साम्राज्याचा गौरव! 'या' किल्ल्याला नक्की भेट द्या

Pratapgad Fort Satara

|

Sakal

येथे क्लिक करा