सह्याद्रीचे सौंदर्य अन् मराठा साम्राज्याचा गौरव! 'या' किल्ल्याला नक्की भेट द्या

Aarti Badade

इतिहासाची साक्ष देणारा प्रतापगड

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरपासून सुमारे २१-२४ किमी अंतरावर दिमाखात उभा असलेला प्रतापगड किल्ला मराठा साम्राज्याच्या पराक्रमाची साक्ष देतो.

Pratapgad Fort Satara

|

Sakal

किल्ल्याची निर्मिती

छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५६ मध्ये जावळीचे खोरे जिंकल्यानंतर मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली या भक्कम गिरीदुर्गाची उभारणी केली.

Pratapgad Fort Satara

|

Sakal

अफजल खानाचा वध आणि भवानी मंदिर

१६५९ मध्ये शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यातील ऐतिहासिक भेटीसाठी हा किल्ला प्रसिद्ध आहे. येथे महाराजांनी स्थापन केलेले भवानी देवीचे सुंदर मंदिरही आहे.

Pratapgad Fort Satara

|

Sakal

इथून दिसतो निळाशार समुद्र!

प्रतापगडाच्या बुरूजावरून सह्याद्रीच्या रांगांचे आणि लांबवर पसरलेल्या कोकण किनारपट्टीचे विहंगम दृश्य पर्यटकांना मंत्रमुग्ध करते.

Pratapgad Fort Satara

|

Sakal

महाबळेश्वरजवळील थंड हवेचे ठिकाण

प्रसिद्ध हिल स्टेशन महाबळेश्वरच्या जवळ असल्यामुळे, पर्यकांसाठी हे एक उत्तम सहलीचे ठिकाण आहे. येथील निसर्गसौंदर्य फोटोग्राफीसाठी अतिशय योग्य आहे.

Pratapgad Fort Satara

|

Sakal

जागतिक वारसा स्थळाचा मान

प्रतापगड हा युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा स्थळांच्या यादीत (२०२४-२५) समाविष्ट असलेल्या १२ 'मराठा लष्करी भूदृश्य' किल्ल्यांपैकी एक मानाचा किल्ला आहे.

Pratapgad Fort Satara

|

Sakal

शिवरायांची अश्वारूढ मूर्ती

किल्ल्यावर १७ फूट उंच आणि भव्य अशी छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती आहे, जी प्रत्येक शिवप्रेमीच्या मनात आदराची भावना निर्माण करते.

Pratapgad Fort Satara

|

Sakal

'या' जागी कधीच बोलू नका! मान-सन्मान टिकवण्यासाठी चाणक्यांनी दिलेत महत्त्वाचे सल्ले

maintain self-respect Chanakya Niti

|

Sakal

येथे क्लिक करा