सकाळ डिजिटल टीम
प्राचीन भारतीय चलनाचे विविध प्रकार आहेत.
प्राचीन काळातील सर्वात लहान आणि महत्वाची चलनप्रणाली. पूर्वी समुद्रकिनारी सापडणाऱ्या कवड्यांचा वापर व्यवहारांसाठी होत असे. त्या काळी मोठ्या व्यवहारांमध्येही कवड्यांचा वापर केला जात असे.
फुटलेल्या कवड्या लहान-मोठ्या व्यवहारांसाठी वापरल्या जात. कमी मूल्य असल्या तरी फुटकी कवडी व्यवहारासाठी उपयुक्त मानली जात होती.
छोटा पण महत्त्वाचा चलनप्रकार होता. दमडी पितळेची असायची आणि लहान व्यवहारांसाठी वापरली जात होती. दमडीला कमी किंमत असली तरी त्याची महत्त्वाची भूमिका होती.
आण्याचा बारावा भाग आणि लहान व्यवहारांसाठी उपयोग होत होता. पै एक छोटा परंतु महत्त्वाचा चलनप्रकार होता. किरकोळ वस्तू विकत घेतन पै वापरले जात होते.
पैसा हा भारतीय चलनाचा प्रमुख प्रकार होता. जुन्या काळातील पैसे तांबे किंवा पितळाचे बनवलेले असायचे. एक रुपयामध्ये ६४ पैसे असायचे.
भारतीय चलनाचा महत्त्वाचा प्रकार आहे. एका रुपयामध्ये १६ आणे असायचे. आना तांब्याच्या धातूपासून तयार होऊन किरकोळ व्यवहारांसाठी उपयुक्त होत होता. किराणा माल, भाजीपाला आणि भाडे भरण्यासाठी वापर होत होता.