Monika Shinde
मस्करा लावल्यामुळे डोळे सुंदर दिसतात, पण रोज किंवा चुकीच्या पद्धतीने मस्करा वापरल्याने डोळ्यांचं नुकसान होऊ शकतं. चला पाहूया काय धोके आहेत.
जर मस्कराचा ब्रश स्वच्छ नसेल किंवा खूप जुना असेल, तर डोळ्यांत जंतू जाऊ शकतात. यामुळे डोळे लाल होणे, पाणी येणे, जळजळ होऊ शकते.
काही मस्करामध्ये केमिकल्स असतात जे संवेदनशील डोळ्यांना त्रास देतात. त्यामुळे डोळ्यांमध्ये चुरचुर किंवा जळजळ होऊ शकते.
मस्करा सतत वापरल्याने आणि योग्य पद्धतीने न काढल्यास पापण्यांचे नैसर्गिक केस गळू शकतात किंवा कमकुवत होऊ शकतात.
डोळ्यांभोवतीची त्वचा खूप नाजूक असते. मस्करा नीट न काढल्यास ही त्वचा कोरडी किंवा काळसर होऊ शकते.
नेहमी स्वच्छ ब्रश वापरा, तसेच प्रत्येक ३-४ महिन्यांनी मस्करा बदला. झोपण्याआधी मस्करा नक्की काढा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मस्करा कधीही दुसऱ्यांसोबत शेअर करू नका.