Saisimran Ghashi
डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काही खास पदार्थ,भाज्या फायदेशीर ठरतात.
डोळे दुखणे, चश्मा लागणे, कमजोर दृष्टी यांसारख्या अनेक समस्या दूर करण्यास हे पदार्थ आणि भाज्या मदत करतात.
गाजरमध्ये भरपूर व्हिटॅमिन A आणि बीटा-कॅरोटीन असतो, जो डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यामुळे दृष्टी चांगली होते आणि नाईट व्हिजन सुधारते.
अंड्यातून मिळणारे प्रोटीन आणि झिंक डोळ्यांसाठी फायदेशीर आहेत. झिंक रेटिना आणि डोळ्यांच्या पेशींना सुधारतो.
बदाममध्ये व्हिटॅमिन E आणि अन्य पोषणतत्त्व असतात, जे डोळ्यांच्या पेशींना संरक्षण देतात आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात.
पनीर आणि दूध हड्ड्यांसोबत डोळ्यांसाठी देखील चांगले आहेत. यामध्ये व्हिटॅमिन D आणि कॅल्शियम असतो, जो डोळ्यांच्या पेशींच्या आरोग्याला मदत करतो.
पालक आणि अन्य हिरव्या पालेभाज्या ल्यूटिन आणि झेक्सँथिन यासारख्या अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतात, जे डोळ्यांची दृष्टी सुधारतात आणि कॅटॅरॅक्टसारख्या आजारांपासून संरक्षण करतात.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.