सकाळ डिजिटल टीम
चेहऱ्याला वाफ घेणे हा त्वचेची डीप क्लिनिंग करण्याचा सर्वात सोपा,प्रभावी मार्ग आहे. आठवड्यातून १ ते २ वेळा वाफ घेतल्याने त्वचेला अनेक नैसर्गिक फायदे मिळतात.
Face Steaming Benefits
sakal
गरम वाफेमुळे त्वचेवरील बंद झालेली रोमछिद्रे (Pores) उघडतात. त्यामुळे आत साचलेली घाण, मृत त्वचा आणि अतिरिक्त तेल सहजपणे बाहेर निघून जाते.
Face Steaming Benefits
sakal
वाफ घेतल्याने नाकाभोवती आणि हनुवटीवर जमा झालेले ब्लॅकहेड्स व व्हाईटहेड्स मऊ पडतात. त्यानंतर हलक्या हाताने स्वच्छ केल्यास ते सहज निघून जातात.
Face Steaming Benefits
sakal
रोमछिद्रांमध्ये तेल आणि बॅक्टेरिया अडकल्याने पिंपल्स येतात. वाफेमुळे ही छिद्रे स्वच्छ होत असल्याने मुरुमांची समस्या मुळापासून कमी होण्यास मदत होते.
Face Steaming Benefits
sakal
गरम वाफेच्या संपर्कात आल्यामुळे चेहऱ्यावरील रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. यामुळे त्वचेकडे रक्ताचा पुरवठा वाढून चेहऱ्यावर नैसर्गिक तेज आणि चमक येते.
Face Steaming Benefits
sakal
वाफ घेतल्यानंतर त्वचा मऊ आणि रोमछिद्रे मोकळी होतात. अशा वेळी लावलेले कोणतेही सिरम, मॉइश्चरायझर किंवा फेस पॅक त्वचेमध्ये खोलवर शोषले जाते.
Face Steaming Benefits
sakal
नियमित योग्य पद्धतीने वाफ घेतल्याने त्वचा सैल पडत नाही. रक्ताभिसरण सुधारल्यामुळे कोलेजनचे उत्पादन वाढून त्वचा अधिक तरुण आणि सुंदर दिसते.
Face Steaming Benefits
sakal
वाफ घेताना चेहरा भांड्यापासून सुरक्षित अंतरावर ठेवावा. आठवड्यातून १ किंवा २ वेळाच ५ ते ७ मिनिटे वाफ घ्यावी आणि वाफेनंतर लगेच टोनर लावून पोअर्स बंद करावेत.
Face Steaming Benefits
sakal
औषधांशिवाय मासिक पाळी रेग्युलर कशी करावी? 'या' ५ चुकांमुळे पाळी लांबत आहे का?
Best Foods for Irregular Periods
sakal