औषधांशिवाय मासिक पाळी रेग्युलर कशी करावी? 'या' ५ चुकांमुळे पाळी लांबत आहे का?

सकाळ डिजिटल टीम

अनियमित मासिक पाळीची मुख्य कारणे

तणाव, अपुरी झोप, बदलती जीवनशैली आणि हार्मोन्समधील बदलांमुळे मासिक पाळी अनियमित होते. योग्य आहार, जीवनशैलीतील बदल या समस्येवर मात करण्यास मदत करतात.

Best Foods for Irregular Periods

|

sakal 

पपई

पपईतील घटकांमुळे गर्भाशयाच्या स्नायूंना चालना मिळते, ज्यामुळे रखडलेली मासिक पाळी वेळेवर येण्यास मदत होते.

Best Foods for Irregular Periods

|

sakal 

अंड्याचे नियमित सेवन

रोज एक अंडे खाल्ल्याने शरीराला ओमेगा-३, प्रोटीन आणि व्हिटॅमिन डी मिळते. यामुळे पाळीदरम्यान होणारे मूड स्विंग्स कमी होऊन रक्ताची कमतरता भरून निघते.

Best Foods for Irregular Periods

|

sakal 

अळशीच्या बिया (जवस)

अळशीच्या बियांमध्ये लिग्नॅन्स आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड मुबलक प्रमाणात असतात. हे घटक शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखून मासिक पाळीचे चक्र नियमित करतात.

Best Foods for Irregular Periods

|

sakal

दालचिनी

मासिक पाळीतील तीव्र वेदना आणि अतिरक्तस्त्राव नियंत्रणात ठेवण्यासाठी दालचिनी उपयुक्त आहे. पाळीच्या पहिल्या दिवसांत दालचिनीचा वापर केल्याने पोटातील कळा कमी होतात.

Best Foods for Irregular Periods

|

sakal 

आल्याचे दाहशामक गुणधर्म

आल्यामध्ये दाहशामक (अँटी-इन्फ्लॅमेटरी) गुणधर्म असतात. पाळीदरम्यान होणारा त्रास आणि वेदना कमी करण्यासाठी आले हे नैसर्गिक पेनकिलरसारखे काम करते.

Best Foods for Irregular Periods

|

sakal 

पोषक तत्त्वांचा शरीरावर सकारात्मक प्रभाव

आपण घेत असलेला आहार थेट पाळीवर परिणाम करत नसला, तरी योग्य पोषक तत्त्वांमुळे संप्रेरकांचे संतुलन राहून एकूणच आरोग्याला मोठा आधार मिळतो.

Best Foods for Irregular Periods

|

sakal 

निरोगी जीवनशैली

पोषक आहारासोबतच पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि मानसिक तणाव कमी ठेवल्यास मासिक पाळीचे चक्र नैसर्गिकरीत्या वेळेवर येण्यास मदत होते.

Best Foods for Irregular Periods

|

sakal 

मैद्याशिवाय बनवा कुरकुरीत रवा पिझ्झा; पाहा सोपी रेसिपी!

Healthy Rava Pizza Recipe

|

sakal 

आणखी वाचा