Aarti Badade
थंडीच्या दिवसात त्वचा निस्तेज आणि कोरडी पडते. अशा वेळी 'फेस स्टीम' म्हणजेच चेहऱ्याला वाफ घेणे हा सर्वात स्वस्त आणि प्रभावी उपाय आहे.
Face Steaming in Winter
Sakal
वाफेमुळे त्वचेची बंद झालेली छिद्रे (Pores) उघडतात. यामुळे त्वचेतील घाण, मृत पेशी आणि जास्तीचे तेल सहज बाहेर पडते, ज्यामुळे चेहरा स्वच्छ होतो.
Face Steaming in Winter
Sakal
वाफेमुळे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स मऊ होतात. परिणामी, ते काढणे सोपे जाते आणि त्वचेचा पोत सुधारतो.
Face Steaming in Winter
Sakal
वाफ घेतल्याने चेहऱ्यावरील रक्ताभिसरण सुधारते. रक्तवाहिन्या प्रसरण पावल्यामुळे त्वचेला भरपूर ऑक्सिजन मिळतो आणि चेहरा ताजेतवाना दिसू लागतो.
Face Steaming in Winter
Sakal
हिवाळ्यातील कोरडेपणामुळे त्वचा ओढली जाते. वाफ घेतल्याने त्वचेला नैसर्गिक ओलावा मिळतो आणि त्वचा मऊ व हायड्रेटेड राहते.
Face Steaming in Winter
Sakal
वाफ घेतल्यानंतर त्वचा सीरम किंवा मॉइश्चरायझर शोषून घेण्यास अधिक सक्षम होते. यामुळे तुम्ही लावलेली महागडी क्रीम्स त्वचेत खोलवर जातात.
Face Steaming in Winter
Sakal
फेस स्टीम केवळ सौंदर्यासाठी नाही, तर आरोग्यासाठीही उत्तम आहे. यामुळे श्वसनमार्ग मोकळा होतो आणि सर्दी-खोकल्याच्या त्रासातून सुटका मिळते.
Face Steaming in Winter
Sakal
वाफ घेताना चेहरा जास्त जवळ नेऊ नका (त्वचा भाजू शकते). स्टीम घेतल्यानंतर लगेच चांगले मॉइश्चरायझर लावा, जेणेकरून त्वचेचा ओलावा टिकून राहील.
Face Steaming in Winter
Sakal
Honey benefits in Winter
sakal