Monika Shinde
फेसवॉश खरेदी करताय? तुमच्या त्वचेसाठी योग्य उत्पादन निवडणे खूप महत्वाचे आहे. चुकीचा फेसवॉश त्वचेला नुकसान पोहचवू शकतो. चला जाणून घेऊयात 5 महत्त्वाच्या गोष्टी
how to choose face wash
Esakal
प्रथम तुमच्या त्वचेचा प्रकार ओळखा. तेलकट, कोरडी किंवा संवेदनशील त्वचा यानुसार योग्य फेसवॉश निवडा. चुकीचा प्रकार त्वचेवर जळजळ, कोरडेपणा किंवा मुरुमे निर्माण करू शकतो.
how to choose face wash
Esakal
फेसवॉशमध्ये असलेले घटक काळजीपूर्वक वाचा. सल्फेट्स, पॅराबेन्स आणि कृत्रिम सुगंध टाळा. मुरुमांसाठी सॅलिसिलिक ॲसिड किंवा बेंझॉयल पेरोक्साइड असलेले फेसवॉश उपयुक्त.
how to choose face wash
Esakal
त्वचेला नैसर्गिक पीएच 4.5 ते 5.5 दरम्यान असतो. पीएच संतुलित फेसवॉश वापरा. जास्त आम्ल किंवा अल्कलाइन त्वचेला हानी पोहचवू शकतात.
how to choose face wash
Esakal
उन्हाळ्यात तेल-नियंत्रित फेसवॉश वापरा. हिवाळ्यात मॉइश्चरायझिंग फेसवॉश योग्य. प्रदूषण किंवा जास्त मेकअप झाल्यास डीप-क्लींजिंग फॉर्म्युला निवडा.
how to choose face wash
Esakal
दिवसातून दोनपेक्षा जास्त वेळा फेसवॉश वापरू नका. जास्त साबणसदृश साफसफाई त्वचेच्या नैसर्गिक तेलांना कमी करते आणि कोरडेपणा वाढवतो.
how to choose face wash
Esakal
विश्वासार्ह ब्रँड निवडा. ऑनलाइन रिव्ह्यू तपासा, पण तुमच्या त्वचेशी जुळणारी उत्पादने निवडा. शक्य असल्यास ट्रायल पॅक वापरून पहा.
how to choose face wash
Esakal