पार्लर नको, फिल्टर नको! 15 मिनिटांच्या फेस योगाने मिळवा ग्लोइंग स्कीन

Aarti Badade

नैसर्गिक सौंदर्याचे गुपित

चेहऱ्यावर नैसर्गिक चमक मिळवण्यासाठी केवळ महागडी उत्पादने पुरेशी नसतात. नियमित 'फेस योगा' केल्याने त्वचेच्या स्नायूंना व्यायाम मिळतो आणि चेहरा तरुण दिसतो.

Face yoga for glowing skin

|

Sakal

रक्ताभिसरण सुधारते

फेस योगामुळे चेहऱ्याकडील रक्ताभिसरण (Blood Circulation) वेगवान होते. यामुळे त्वचेच्या पेशींना पुरेसा ऑक्सिजन मिळतो आणि त्वचा निरोगी व चमकदार बनते.

Face yoga for glowing skin

|

sakal

पफ पोझ

तोंडात शक्य तितकी हवा भरून तोंड बंद ठेवा. ही हवा आधी उजव्या गालात, मग डाव्या गालात आणि नंतर ओठांच्या वरच्या भागात फिरवा. यामुळे गालांचे स्नायू घट्ट होतात.

Face yoga for glowing skin

|

sakal

किस अँड स्माईल

यामध्ये आधी चुंबन घेत असल्याप्रमाणे ओठ बाहेर काढा आणि त्यानंतर लगेच एक मोठी स्माईल द्या. या कृतीमुळे जबड्याची लाईन सुधारते आणि त्वचा लटकत नाही.

Face yoga for glowing skin

|

Sakal

व्ही पोझ

दोन्ही हातांची मधली बोटे भुवयांच्या मधोमध आणि तर्जनी डोळ्यांच्या बाहेरील टोकाला ठेवा. आता वरच्या दिशेला पहा आणि डोळे मिचकावण्याचा प्रयत्न करा. डोळ्यांखालील सूज कमी होते.

Face yoga for glowing skin

|

sakal

लायन पोझ

या योगामध्ये तुमची जीभ शक्य तितकी बाहेर काढा आणि डोळे मोठे करून समोर पहा. ही पोझ चेहऱ्याचे सर्व स्नायू ताणण्यास आणि रक्ताभिसरण वाढवण्यास मदत करते.

Face yoga for glowing skin

|

sakal

योगापूर्वी 'हे' लक्षात ठेवा

फेस योगा सुरू करण्यापूर्वी हात आणि चेहरा स्वच्छ धुवा. तसेच दिवसातून भरपूर पाणी प्या; कारण हायड्रेटेड शरीरामुळे योगाचा परिणाम अधिक वेगाने दिसून येतो.

Face yoga for glowing skin

|

Sakal

हिमोग्लोबिन कमी असण्याची 'ही' 8 लक्षणे दुर्लक्ष करू नका!

Symptoms of low hemoglobin

|

Sakal

येथे क्लिक करा