Pranali Kodre
जुलाब त्रासदायक असले तरी, योग्य आहाराने तो सहज नियंत्रणात येतो.
मुगाचे कढण पचायला हलके, पौष्टिक आणि पोट शांत ठेवणारे आहे. जुलाबात ते खूप उपयुक्त ठरते.
खसखस पचनसंस्थेला गारवा देते. ताकातली पेज जुलाबात पोटाला आराम देते.
शिंगाड्याची लापशी शक्तिवर्धक असून जुलाबात उपयुक्त आहे. ती लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी फायदेशीर आहे.
बेलफळ हे पचनासाठी खूप चांगले आहे. मुरंबा घेतल्याने पोटात घट्टपणा येतो.
कोहळ्याचा पाक थंडावा देतो आणि जुलाबात उपयोगी पडतो. हे एक उत्तम घरगुती औषध आहे.
जुलाबामुळे शरीरातील पाणी कमी होते. नारळपाणी हे शरीराला नैसर्गिकरित्या हायड्रेट ठेवण्यासाठी योग्य आहे.
लिंबूपाणी शरीरातील पाणी टिकवून ठेवते आणि पोट साफ ठेवते.
डाळिंब पचन सुधारते आणि शरीराची कमजोरी दूर करते.
तळलेले, मसालेदार पदार्थ खाणे टाळा. साधा, शिजवलेला आहार घ्या आणि भरपूर पाणी प्या.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.