Pranali Kodre
इंडियन प्रीमियर लीग २०२५ (IPL) स्पर्धेला दोन महिन्यात सुरुवात होणार आहे.
यंदा या हंगामासाठी मेगा ऑक्शन झाल्याने बऱ्याच संघात मोठे बदल झाले आहेत.
मुंबई इंडियन्सकडून २०१८ ते २०२४ दरम्यान आयपीएल खेळलेल्या इशान किशनला २०२५ आयपीएल लिलावात सनरायझर्स हैदराबादने खरेदी केले.
सनरायझर्स हैदराबादची संघमालकीन काव्या मारनने त्याला ११.२५ कोटी रुपयांना खरेदी केले आहे.
यानंतर आता सध्या त्याचे आणि काव्या मारन हिचे एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मात्र त्यांचे हे एकत्र फोटो खरे नाहीत, हे पडताळणीनंतर आमच्या लक्षात आले.
इशान आणि काव्या मारन यांचे हे फोटो आर्टिफिशियन इंटेलिजन्स अर्थात AI निर्मित आहेत.
त्यामुळे त्यांनी कोणतेचीही एकत्र फोटो काढले नसल्याचे स्पष्ट होत आहे.