संतोष कानडे
१५२६ मध्ये उदयास आलेलं मुघल साम्राज्य १८५७च्या उठावानंतर पूर्णपणे संपुष्टात आलं.
याचं महत्त्वाचं कारण म्हणजे औरंगजेबची धोरणं. त्याने प्रदीर्घ काळ युद्ध केलं, विशेषतः दख्खनची मोहीम.
यामुळे साम्राज्याचा खजिना रिकामा झाला आणि सत्ता कमकुवत होत गेली. त्याच्या धोरणांमुळे राजपूत शीष मराठा यांच्याशी संबंध बिघडले.
१७०७ मध्ये औरंगजेबच्या मृत्यूनंतर गादीवर आलेले राजे अय्याशी करणारे आणि कमकुवत होते. या राजांच्या दरबारामध्ये गटबाजी वाढली.
याच काळात मराठा साम्राज्याने आठराव्या शतकात मुघलांना सळो की पळो करुन सोडलं आणि दिल्लीत प्रभाव वाढवला.
मराठ्यांच्या ताकदीपुढे मुघल सम्राट केवळ नावापुरता उरला. याचवेळी शीख, जाट, राजपूत यांनी मुघलांचं वर्चस्व झुगारुन दिलं.
हाच फायदा उचलत परकीय आक्रमकांनी दिल्लीवर हल्ले केले. इराणच्या नादिरशाहने दिल्लीवर आक्रमण करुन प्रचंड लूट केली.
यानेच मयूर सिंहासन आणि कोहिनूर हिरा नेला. पुढे अहमदशाह अब्दालीच्या आक्रमणांनी उरलंसुरलं मुघल साम्राज्य संपुष्टात आलं.
१७५७चं प्लासी युद्ध आणि १७६४च्या बक्सर युद्धानंतर ब्रिटिशांनी राजकीय सत्ता हातात घेतली.
१८८७ ला शेवटचा मुघल बाहदूरशाह जफरला म्यानमारला हाकलून लावलं आणि भारतावर इंग्रजांची सत्ता आली.