दक्षिण भारतातील 6 प्रसिद्ध द्रौपदी मंदिरे

Monika Shinde

द्रौपदीची विशेष पूजा

द्रौपदी महाभारतातील एक प्रमुख स्त्री पात्र असून तिला काही ठिकाणी देवीच्या रूपात पूजले जाते. दक्षिण भारतात अशी काही मंदिरे आहेत जिथे द्रौपदीची विशेष पूजा आणि सन्मान केला जातो.

द्रौपदी अम्मन मंदिर, कोठमंगलम (तमिळनाडू)

ही द्रौपदीला समर्पित प्राचीन मंदिरे आहे जिथे 'थीमिथी' म्हणजे आगावर पायी चालण्याचा विशेष समारंभ दरवर्षी साजरा होतो.

मेलडी द्रौपदी अम्मन मंदिर, वेल्लोर (तमिळनाडू)

या मंदिरात द्रौपदीला आईच्या स्वरूपात पूजले जाते. तिला संयम आणि शुद्धतेची देवी मानले जाते.

श्री धर्मराज-द्रौपदी मंदिर, बेंगळूरु (कर्नाटक)

वाहणिकुळ क्षत्रियांनी बांधलेले हे मंदिर सुमारे ८०० वर्षे जुने आहे. येथे पांडवांसह द्रौपदीचीही पूजा केली जाते. करगा उत्सव येथे विशेष महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती डोक्यावर भांडे ठेवून विविध विधी पार पाडतो.

द्रौपदी अम्मन मंदिरे, कुंभकोणम (तमिळनाडू)

कुंभकोणममध्ये द्रौपदीला समर्पित अनेक मंदिरे आहेत, जिथे वर्षभर विविध उत्सव साजरे केले जातात.

द्रौपदी रथ, महाबलीपुरम (तमिळनाडू)

महाबळिपूरममधील पंच रथांपैकी हा रथ एका ग्रॅनाईट खडकावर कोरलेला आहे, जो द्रौपदीच्या नावावर आहे.

धर्मराज मंदिर, चेन्नई (तमिळनाडू)

हा मंदिर द्रौपदी आणि पांडवांना समर्पित असून ३०० वर्षांहून जुना आहे. येथे दरवर्षी उरियाडी नावाचा उत्सव मोठ्या भक्तीने साजरा केला जातो.

१२ वी नंतर योग्य कोर्स निवडायचा आहे? हे पर्याय तुमच्यासाठी आहेत

येथे क्लिक करा