Monika Shinde
सोलापूर शहर आपल्या खास आणि चवदार खाद्य पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. इथे विविध खाद्य पदार्थांच्या चवीची वेगळीच जादू आहे.
सोलापूरच्या सात रस्ता चौकात नाझ पायनापल गाडी प्रसिद्ध आहे. इथे मिळणाऱ्या मस्तानी आणि मलई मस्तानीची चव एकदम खास आहे.
सात रस्त्यावरील बाबुरावच्या गाड्यावर भेळ, कचोरी, पाणी पुरी आणि चटणीपुरी मिळतात. तिखट, गोड आणि तीव्र चटणीमुळे इथे येणारा प्रत्येक ग्राहक खुश होतो.
सोलापूरच्या सोरेगाव रोडवरील शगुफ्ता दाल चावल हॉटेल खूप प्रसिद्ध आहे. ते शाहकारी पद्धतीने तयार केले जातात.
1997 मध्ये सुरू केलेल्या महेश आंध्र भजीत खास हैदराबादच्या मिरच्यांचा वापर केला जातो. भजीचा तिखट आणि चवदार स्वाद आवडणाऱ्यांसाठी ही खास भेट आहे.
सोलापूर- पुणे हायवेवरील लांबोटी गावात जयशंकर हॉटेलमध्ये मक्क्या चिवड्याची चव एकदम खास आहे. तिखट आणि गोड चवीचा अनोखा मिश्रण