स्मृती नाही तर RCB च्या 'या' खेळाडूला प्रेक्षकानं केलं प्रपोज

अनिरुद्ध संकपाळ

महिला प्रीमियर लीगमध्ये मंगळवारी रॉयल चॅलेंजर बेंगलोर आणि गुजरात जायंट्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात आरसीबीने लीगमधील आपला सलग दुसरा सामना जिंकला.

स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील आरसीबीने गुजरातचा आठ विकेट्सनी पराभव केला. यापूर्वी त्यांनी यूपी वॉरियर्सचा पराभव केला होता.

या सामन्यावेळी एका गोष्टीने सर्वांचेच लक्ष वेधले. सामन्यादरम्यान एका चाहत्याने आरसीबीच्या एका खेळाडूला थेट लग्नाची मागणी घातली.

आरसीबीची ही खेळाडू कर्णधार स्मृती नसून ती युवा सेन्सेशन श्रेयांका पाटील आहे.

स्टँडमध्ये बसलेल्या चाहत्याने हातात प्लेकार्ड घेत प्रपोज केलं. त्याने श्रेयांका तू माझ्याशी लग्न करणार का असं विचारलं.

ही घटना सामन्याच्या सातव्या षटकात घडली. ही क्षणचित्रे टीव्हीवरून लाईव्ह दाखवण्यात आल्यानंतर आरसीबीच्या डग आऊटमधील सर्व खेळाडू हसू लागल्या होत्या.

केएलचं प्रमोशन मात्र... बीसीसीआयनं कोणाचं केलं डिमोशन