केएलचं प्रमोशन मात्र... बीसीसीआयनं कोणाचं केलं डिमोशन

अनिरुद्ध संकपाळ

दुखापतीमुळे वर्षभरापासून संघाबाहेर असलेल्या ऋषभ पंतचे डिमोशन झाले आहे. त्याला ग्रेड A मधून ग्रेड B मध्ये टाकण्यात आले आहे.

अक्षर पटेलच्या देखील ग्रेडमध्ये नकारात्मक बदल झाला आहे. त्याला देखील ग्रेड A मधून ग्रेड B मध्ये ठेवण्यात आलं आहे.

कधीकाळी भारताचा उपकर्णधार असलेल्या केएल राहुलचे दिवस फिरले होते. त्याला संघातील स्थानही गमावावे लागले होते. मात्र आता त्याचे ग्रेड B मधून ग्रेड A मध्ये प्रमोशन झाले आहे.

कसोटी, टी 20 अन् वनडेमध्ये देखील दमदार गोलंदाजी करत मोहम्मद सिराजने सर्वांना प्रभावित केलं आहे. त्याचे देखील ग्रेड B मधून ग्रेड A मध्ये प्रमोशन झालं आहे.

शुभमन गिल देखील तीनही फॉरमॅटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करतोय. त्याचे देखील प्रमोशन झाले असून त्याची ग्रेड आता B वरून A झाली आहे.

कुलदीप यादव देखील आता जवळपास तीनही फॉरमॅटमध्ये दमदार कामगिरी करतोय. त्याला देखील बीसीसीआयने बढती दिली असून तो ग्रेड C मधून ग्रेड B गेला आहे.

हिंमत, निश्चय अन् प्रतिकार... बऱ्याच दिवसानंतर विराटचं ट्विट