Pranali Kodre
भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहलचा काही महिन्यांपूर्वी धनश्री वर्मासोबत घटस्फोट झाला आहे.
घटस्फोट होत असतानाच त्याचं नाव आरजे महावशसोबतही जोडलं गेलं. ते दोघं एकत्र अनेकदा स्पॉट झाल्याने त्यांच्याबद्दल चर्चा सुरू झाल्या होत्या.
दरम्यान, दोघांनीही अद्याप खुलेपणाने त्यांच्या नात्याबद्दल कबुली दिलेली नाही. महावशने अनेकदा ते फक्त मित्र असल्याचे सांगितले होते.
मात्र, द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये चहलने अप्रत्यक्षपणे तो रिलेशनशीपमध्ये असल्याचे संकेत दिले होते. या शोमध्ये त्याला लिपस्टिकवरून डिवचल्यानंतर त्याने उत्तर दिले होते की आता संपूर्ण भारताला माहित आहे.
त्यानंतर पुन्हा त्या दोघांच्या रिलेशनबाबत चर्चांना उधाण आले, त्यातच नुकतेच त्यांनी केलेल्या पोस्टने या चर्चांना अधिक हवा दिली आहे.
सध्या इंग्लंडमध्ये भारत - इंग्लंड कसोटी मालिका सुरू आहे, तर विम्बल्डन स्पर्धाही पार पडली. यावेळीच ते दोघेही लंडनमध्ये असल्याचे समजत आहे.
चहल आणि महावश या दोघांनीही नुकतेच लंडनमधील त्यांचे वैयक्तिक फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये ते एकमेकांसोबत दिसत नसले, तरी फोटोंमधील बॅकग्राऊंड सारखेच असल्याचे चाहत्यांनी ओळखले आहे.
त्यामुळे आता ते खरंच डेटिंग करत आहेत का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.