विराट कोहलीला 'चिकू' हे टोपननाव कसं मिळालं? जाणून घ्या रंजक कहाणी

Pranali Kodre

लोकप्रिय खेळाडू

भारताचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे.

Virat Kohli | Sakal

विराट कोहलीचे टोपननाव

विराटला चिकू असं टोपननावही आहे आणि या नावामागील कहाणीही रंजक आहे.

Virat Kohli | Sakal

धोनीने दिली प्रसिद्धी

विराटने अनेकदा त्याच्या नावामागील कहाणी सांगितली आहे. त्याच्या म्हणण्यांनुसार माजी कर्णधार एमएस धोनीने हे नाव प्रसिद्ध केलं.

Virat Kohli | Sakal

धोनी चिकू आवाज द्यायचा...

धोनी अनेकदा मैदानात विराटला चिकू म्हणून आवाज देत असल्याने स्टंप माईकमध्ये ते कैद झालं आणि सर्वांना विराटचं टोपननाव माहित झालं.

Virat Kohli | Sakal

कोणी दिलं नाव?

पण, त्याला हे नाव धोनीने दिलेलं नाही, तर प्रथम श्रेणी क्रिकेटमधील एका प्रशिक्षकाने दिले आहे.

Virat Kohli | Sakal

२००७ ची गोष्ट...

विराटने सांगितले की साधारण २००७ च्या दरम्यान त्याचे गोबरे गाल होते. त्याचवेळी त्याला केस गळत आहेत असं वाटत असल्याने त्याने ते अगदी बारीक कापले होते.

Virat Kohli | Sakal

चिकू सश्यासारखा लूक

अगदी बारीक केस कापल्याने त्याचे मोठे कान आणि गोबरे गाल उठून दिसत होते, त्यामुळे प्रशिक्षकाने तो चंपक या कॉमिकमधील चिकू सश्यासारखा दिसत असल्याचे म्हणत त्याला हे टोपननाव दिलं.

Virat Kohli | Sakal

चिकू ओळख बनली

त्यापुढे त्याच्यासोबतच हे टोपननाव राहिलं. त्याचे अनेक संघसहकारी आजही त्याला या टोपननावाने बोलवतात.

Virat Kohli | Sakal

चिकू ते किंग कोहली

पण, हा चिकू आता क्रिकेटमधील मोठा सुपरस्टार झाला असून तो आता क्रिकेटवर्तुळात 'किंग कोहली' म्हणूनही ओळखला जातो.

Virat Kohli | Sakal

सुनील गावसकरांबद्दल 'या' १० खास गोष्टी माहित आहेत का?

Sunil Gavaskar | Sakal
येथे क्लिक करा.