स्टीव्ह स्मिथची 'ती' १ धाव पाहण्यासाठी, चाहत्याचा ८३५८ किमी प्रवास!

Pranali Kodre

ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका

ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका संघात कसोटी मालिकेला २९ जानेवारीपासून सुरुवात झाली असून पहिला सामना गॉलला खेळला जात आहे.

Steve Smith | Sakal

मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर

या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर होता. त्याला यासाठी फक्त एका धावेची गरज होती.

Steve Smith | Sakal

पहिलाच चेंडू

तो ३१ व्या षटकात फलंदाजीला आला आणि त्याने पहिलाच चेंडू खेळताना पहिली धाव काढली.

Steve Smith | Sakal

१०००० धावा

याबरोबरच स्मिथने कसोटीमध्ये १०००० धावांचा टप्पा पार केला.

Steve Smith | Sakal

चौथा ऑस्ट्रेलियन खेळाडू

स्मिथ १० हजार कसोटी धावा करणारा जगातील १५ वा खेळाडू आहे, तर ऑस्ट्रेलियाचा चौथा खेळाडू ठरेल.

Steve Smith | Sakal

श्रीलंका दौऱ्याची प्रतिक्षा

तो या सामन्यापूर्वी बॉर्डर-गावसकर ट्रॉफी २०२४-२५ मालिका संपली तेव्हा ९९९९ धावांवर होता. त्यामुळे त्याची १० हजारावी धाव पूर्ण करण्यासाठी श्रीलंका दौऱ्याची वाट पाहायला लागली.

Steve Smith | Sakal

८३५८ किमी प्रवास

दरम्यान, त्याची ही १० हजारावी धाव पाहाण्यासाठी काही चाहते ऑस्ट्रेलियावरून श्रीलंकेला तब्बल ८३५८ किमी प्रवास करून आले आहेत.

Steve Smith | Sakal

पोस्टर झळकावलं

याबद्दल त्या चाहत्यांनी स्टेडियममध्ये पोस्टर झळकावत माहिती दिली. महत्त्वाचे म्हणजे त्यांचा हा प्रवास वाया गेलेला नाही, कारण स्मिथने १० हजार धावा पूर्ण केल्या आहेत.

Steve Smith | Sakal

ICC पुरस्कारांवर भारतीयांचा ठसा! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

Jasprit Bumrah | Sakal
येथे क्लिक करा