Pranali Kodre
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) २०२४ पुरस्कार विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा थोडक्यात आढावा घेऊ.
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने हा मानाचा सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार (आसीसी सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू) पटकावला आहे.
न्यूझीलंडची अष्टपैलू एमेलिया केर सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
भारताचा जसप्रीत बुमराह आयसीसीचा सर्वोत्तम कसोटीपटू ठरला आहे.
अफगाणिस्तानचा खेळाडू अझमतुल्ला ओमरझाईला सर्वोत्तम पुरुष वनडे क्रिकेटपटूचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
सर्वोत्तम महिला वनडे क्रिकेटपटूचा पुरस्कार भारतीय स्टार फलंदाज आणि उपकर्णधार स्मृती मानधनाला जाहीर झाला आहे.
सर्वोत्तम पुरुष टी२० क्रिकेटपटू पुरस्कार भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याला मिळाला आहे.
सर्वोत्तम महिला टी२० क्रिकेटपटू पुरस्कार न्यूझीलंडच्या एमेलिया केर हिला मिळाला आहे.
सर्वोत्तम पुरुष उदयोन्मुख क्रिकेटपटू पुरस्कार श्रीलंकेच्या कामिंडू मेंडिसला मिळाला आहे.
सर्वोत्तम महिला उदयोन्मुख क्रिकेटपटू पुरस्कार दक्षिण आफ्रिकेच्या अनेरी डर्कसनला मिळाला आहे.
नामिबियाच्या गरहार्ड इरासमस याला सर्वोत्तम असोसिएट पुरुष क्रिकेटपटू पुरस्कार जाहीर झाला आहे.
युएईच्या इशा ओझा हिला सर्वोत्तम असोसिएट महिला क्रिकेटपटू पुरस्कार जाहीर झाला आहे.
सर्वोत्तम अंपायरचा पुरस्कार इंग्लंडच्या रिचर्ड एलिंगवर्थ यांना जाहीर झाला आहे.