Pranali Kodre
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात ५ मार्च रोजी खेळवला गेला.
या सामन्यात न्यूझीलंडकडून केन विलियम्सनने शतकी खेळी केली. त्याने ९४ चेंडूत १० चौकार आणि २ षटकारांसह १०२ धावांची खेळी केली.
या खेळीदरम्यान विलियम्सनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १९ हजार धावा पूर्ण केल्या. तो १९ हजार आंतरराष्ट्रीय धावा करणारा पहिलाच न्यूझीलंडचा खेळाडू आहे.
विलियम्सनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४४० डावात खेळताना १९ हजार धावा पूर्ण केल्या आहेत.
त्यामुळे विलियम्सन आता सर्वात कमी डावात १९ हजार धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आला आहे. त्याने जो रुट आणि रिकी पाँटिंग यांना मागे टाकले आहे.
जो रुट आणि रिकी पाँटिंग या यादीत संयुक्तरित्या आता पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यांनी प्रत्येकी ४४४ डावात १९ हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या होत्या.
या विक्रमाच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर दिग्गज ब्रायन लारा असून त्यांनी ४३३ डावात १९ हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या होत्या.
दुसऱ्या क्रमांकावर भारताचा मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. त्याने ४३२ डावात १९ हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या होत्या.
पहिल्या क्रमांकावर भारताचाच दिग्गज विराट कोहली असून त्याने ३९९ डावात १९ हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
ही आकडेवारी ६ मार्च २०२५ पर्यंतची आहे.