Pranali Kodre
कसोटी क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत ११ फलंदाजांनी ३४ किंवा त्यापेक्षा अधिक शतके केली आहेत.
मात्र, या ११ खेळाडूंपैकी केवळ दोनच खेळाडूंना २०० डावांपेक्षा कमी डावात खेळताना ३४ शतके करता आली आहेत.
सर्वात कमी डावात ३४ कसोटी शतके करणाऱ्या ५ खेळाडूंबद्दल जाणून घेऊया.
सर्वात कमी डावात ३४ शतके करणाऱ्या खेळाडूंमध्ये पाचव्या क्रमांकावर पाकिस्तानचा युनूस खान आहे. त्याने २०६ डावात ३४ वे शतक केले होते.
सर्वात कमी डावात ३४ शतके करणाऱ्या खेळाडूंमध्ये चौथ्या क्रमांकावर भारताचे दिग्गज सुनील गावसकर आहेत. त्यांनीही २०६ डावात ३४ शतके केली होती.
सर्वात कमी डावात ३४ शतके करणाऱ्या खेळाडूंमध्ये तिसऱ्या क्रमांकावर स्टीव्ह स्मिथ आहे. त्याने २०१ डावात ३४ वे कसोटी शतक ठोकले.
सर्वात कमी डावात ३४ शतके करणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग आहे. त्याने १९३ डावात ३४ कसोटी शतके केली होती.
सर्वात कमी डावात ३४ शतके करणाऱ्या खेळाडूंमध्ये पहिल्या क्रमांकावर भारताचा मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. त्याने १९२ डावात ३४ कसोटी शतके केली होती.