Pranali Kodre
नितीश कुमार रेड्डीने मेलबर्नमधील बॉक्सिंग डे कसोटीत भारताकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना ऐतिहासिक शतक केले.
त्याने भारताकडून पहिल्या डावात आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना ११४ धावांची खेळी केली.
परदेशात भारताकडून आठव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना कसोटीत शतक करणारा नितीश पाचवा खेळाडू ठरला.
याआधी १९९० साली कपिल देव यांनी इंग्लंडविरुद्ध द ओव्हल मैदानावर ११० धावांची खेळी केली होती.
तसेच अजित आगरकरने इंग्लंडविरुद्धच २००२ साली लॉर्ड्सवर १०९ धावांची खेळी केली होती.
अनिल कुंबळेने इंग्लंडविरुद्ध द ओव्हलवर २००७ साली नाबाद ११० धावांची खेळी केली होती.
हार्दिक पांड्याने २०१७ साली पाल्लेकेले येथे श्रीलंकेविरुद्ध १०८ धावांची खेळी केली होती.