Pranali Kodre
आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्सला २४ एप्रिल रोजी ११ धावांनी पराभूत केले.
बंगळुरूच्या विजयात वेगवान गोलंदाज जोश हेलजलवूडने ४ विकेट्स घेत मोलाचा वाचा उचलला. त्यामुळे त्याला सामनावीर पुरस्कारही मिळाला.
हेजलवूडने ४ विकेट्स घेण्यासोबतच आयपीएलमध्ये ५० विकेट्सचा टप्पाही पार केला, त्याने ३६ सामन्यात ५० विकेट्स घेतल्या आहेत.
यामुळे हेजलवूड सर्वात कमी सामन्यात ५० आयपीएल विकेट्स घेणारा चौथ्या क्रमांकाचा वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्याने मिचेल मॅकक्लेनाघनची बरोबरी केली आहे.
मिचेल मॅकक्लेनाघननेही आयपीएलमध्ये ३६ सामन्यातच ५० विकेट्स घेतल्या होत्या.
सर्वात कमी सामन्यात ५० आयपीएल विकेट्स घेणाऱ्या वेगवान गोलंदाजांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खलील अहमद असून त्याने ३५ सामन्यात हा टप्पा गाठला होता. पहिल्या ५ मध्ये हा एकमेव भारतीय खेळाडू आहे.
सर्वात कमी सामन्यात ५० आयपीएल विकेट्स घेणाऱ्या वेगवान गोलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर लसिथ मलिंगा असून त्याने ३३ सामन्यात हा टप्पा पार केला होता.
सर्वात कमी सामन्यात ५० आयपीएल विकेट्स घेणाऱ्या वेगवान गोलंदाजांमध्ये पहिल्या क्रमांकावर कागिसो रबाडा आहे. त्याने २७ सामन्यात हा टप्पा गाठला होता.