Pranali Kodre
दक्षिण आफ्रिकेचा प्रभारी कर्णधार विआन मुल्डरने ७ जुलै रोजी झिम्बाब्वे विरुद्ध कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्रिशतक झळकावण्याचा पराक्रम केला.
या सामन्यात मुल्डरने पहिल्या डावात ३३४ चेंडूत ४९ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ३६७ धावांची खेळी केली.
मुल्डरने २९७ चेंडूत त्याचे त्रिशतक पूर्ण केले. कसोटीत त्रिशतक करणारा दक्षिण आफ्रिकेचा तो हाशिम आमलानंतरचा दुसराच क्रिकेटपटू ठरला.
याशिवाय कसोटीत सर्वात कमी चेंडूत त्रिशतक करणारा मुल्डर दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला.
कसोटीत सर्वात कमी चेंडूत त्रिशतक करण्याचा विक्रम विरेंद्र सेहवागच्या नावावर आहे.
विरेंद्र सेहवागने २००८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चेन्नईत २७८ चेंडूत त्रिशतक केले होते.
कसोटीत सर्वात कमी चेंडूत त्रिशतक करण्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा हॅरी ब्रुक आहे.
ब्रुकने २०२४ मध्ये पाकिस्तानविरुद्ध मुलतान कसोटीत ३१० चेंडूत त्रिशतक केले होते.