Pranali Kodre
भारताचा कर्णधार शुभमन गिल याचा जन्म तारीख ८ सप्टेंबर १९९९ आहे. त्यामुळे त्याचा मुलांक ८ आहे.
दरम्यान, ८ मुलांक असलेल्या वक्ती म्हणजेच ज्यांची जन्म दिनांक ८, १७, २६ आहे, अशा व्यक्ती अंकशास्त्रानुसार साधारण कशा असतात, याबाबत जाणून घेऊ.
८ क्रमांकाचा कारक ग्रह शनी असल्याने जीवनात संघर्ष, संयम आणि कर्म महत्त्वाचे ठरते. शनी हा शुक्र, बुध, राहू आणि केतू यांच्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवतो, तर सूर्य व मंगळ याच्याशी त्याचे वैर आहे.
मूलांक ८ असणाऱ्या व्यक्ती शिस्तप्रिय, महत्त्वाकांक्षी आणि कठोर मेहनत करणाऱ्या असतात.
मूलांक ८ च्या व्यक्ती हे लोक धार्मिक प्रवृत्तीचे असतात. तसेच आध्यात्मिकतेकडे वळण्याचे परिवर्तन अनुभवांवर आधारित हळुहळू होते.
या व्यक्तींना अनेकदा कठीण प्रसंगांचा सामना करावा लागतो. मेहनतीनंतरही अपेक्षित यश मिळत नाही. त्यांचं जीवन चढ-उतारांनी भरलेलं असतं. पण यातूनच त्यांना अनुभव मिळतो.
शनी म्हणजे कर्म, आणि त्यामुळेच ते स्वतःशी प्रामाणिक राहतात.
हे लोक आळशी असण्याची देखील शक्यता असते, तसेच कामाची गती धीमी असते, जे त्यांच्या यशाच्या प्रवासात अडथळा ठरू शकते.
व्यक्ती तांत्रिक क्षेत्र, अभियांत्रिकी, पेट्रोकेमिकल्स, स्टील उद्योग, व्यापार, उत्पादन आणि निर्यात-आयात यामध्ये चांगले यश मिळवू शकतात.
या व्यक्तींनी जुगार किंवा कोणत्याही सट्टाबाजीत गुंतवणूक करू नये.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.