उपवासात असा साबुदाणा खाणे टाळा! पोषणतज्ञांनी सांगितला योग्य मार्ग

Aarti Badade

उपवासातील पदार्थ

नवरात्रीच्या उपवासात साबुदाणा, राजगिरा आणि बटाटे असे पदार्थ खाल्ले जातात. पण हे पदार्थ आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत, हे तुम्हाला माहीत आहे का?

Sabudana eating Health Tip

|

sakal

साबुदाणा खाणे योग्य आहे का?

पोषणतज्ञ यांच्या मते, साबुदाणा हा फक्त कॅलरींनी भरलेला असतो, त्यात फार कमी पोषण असते. त्यामुळे उपवासात तो मुख्य आहार म्हणून घेऊ नये.

Sabudana eating Health Tip

|

Sakal

साबुदाण्याचे दुष्परिणाम

साबुदाणा कसावा वनस्पतीपासून बनवलेला असतो. त्यात प्रथिने, फायबर आणि जीवनसत्त्वे कमी असतात.जास्त प्रमाणात साबुदाणा खाल्ल्यास गॅस, अपचन किंवा पोट फुगण्याचा त्रास होऊ शकतो.

Sabudana eating Health Tip

|

Sakal

तात्काळ ऊर्जा

साबुदाण्याला 'ऊर्जा देणारे अन्न' म्हटले जाते. कारण ते खाल्ल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते, पण त्यातून फारसे पोषण मिळत नाही.

Sabudana eating Health Tip

|

Sakal

रक्तातील साखर

साबुदाण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असल्याने तो रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतो, आणि नंतर ती वेगाने कमी होऊ शकते.

Sabudana eating Health Tip

|

Sakal

योग्य मार्ग

साबुदाणा खाताना त्यासोबत दही, चीज किंवा सुकामेवा यांसारख्या पौष्टिक गोष्टींचा समावेश करा. १०० ग्रॅम साबुदाण्यामध्ये सुमारे ३५० किलोकॅलरीज असतात.

Sabudana eating Health Tip

|

Sakal

महत्त्वाचा सल्ला

उपवासाच्या दिवसांत साबुदाणा खाण्याऐवजी राजगिरा, शेंगदाणे, माखणा (कमळाचे दाणे) आणि फळे यांचा आहारात समावेश करा.

Sabudana eating Health Tip

|

Sakal

वैज्ञानिकांचा इशारा यंदा थंडी जास्त; आजारी पडू नका! घरात ठेवा हे सोपे उपाय

Ayurvedic Remedies to Keep You Warm This Winter

|

Sakal

येथे क्लिक करा