दिवसा लाज वाटते म्हणून रात्री भिक्षा मागणारा मुघल राजपुत्र

संतोष कानडे

ब्रिटिश

१८५७ च्या उठावानंतर ब्रिटिशांनी दिल्लीवर ताबा मिळवताच, मुघल साम्राज्याचे वैभव धुळीस मिळून राजघराण्यावर अन्नान्न दशा झाली.

बहादूरशाह जफर

शेवटचा सम्राट बहादूरशाह जफर याला रंगूनला कैद करून पाठवण्यात आले आणि त्याच्या अनेक वंशजांची ब्रिटिशांनी क्रूरपणे हत्या केली.

वारसदार

जे मुघल वारसदार जिवंत वाचले, त्यांना लाल किल्ल्यातून हाकलून दिल्यानंतर त्यांनी दिल्लीच्या गल्ल्यांमध्ये आश्रय घेतला.

राजपुत्र

एकेकाळी सोन्या-चांदीत लोळणारे राजपुत्र आणि राजकन्या अन्नाच्या एका घाससाठी मोताद झाले आणि त्यांना भिक्षा मागण्याची वेळ आली.

मिर्झा नासिर-उल मुल्क

सम्राटाचा नातू मिर्झा नासिर-उल मुल्क हा अर्धांगवायूने आजारी असताना दिल्लीच्या रस्त्यांवर सरपटत भिक्षा मागू लागला होता.

कमर सुल्तान

दुसरा राजपुत्र मिर्झा कमर सुल्तान हा ओळखीच्या भीतीने आणि लाजेपोटी फक्त रात्रीच्या अंधारात भिक्षा मागण्यासाठी बाहेर पडत असे.

प्रतिष्ठा

मुघल राजकन्यांना आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी घरकाम करावे लागले किंवा अत्यंत गरिबीत झोपड्यांमध्ये दिवस काढावे लागले.

पेन्शन

ब्रिटिशांनी मुघल वारसांना केवळ ५ ते १० रुपये महिना पेन्शन देऊ केली होती, जी त्यांच्या जगण्यासाठी पुरेशी नव्हती.

दगड

ज्या हातांनी कधी साधे कामही केले नव्हते, त्या हातांनी दगड फोडणे, मजुरी करणे आणि लोकांची धुणीभांडी करण्याची वेळ मुघल वंशजांवर आली.

वैभवशाली साम्राज्य

एका वैभवशाली साम्राज्याचा असा करुण अंत झाला की, जगातील सर्वात श्रीमंत घराण्याचे वारसदार दिल्लीच्या रस्त्यांवर अनामिक भिकारी म्हणून मरण पावले.

भारत सरकारकडे किती टन सोनं आहे?

<strong>येथे क्लिक करा</strong>