संतोष कानडे
एप्रिल २०२६ च्या ताज्या आकडेवारीनुसार, भारताच्या मध्यवर्ती बँकेकडे आता ८८० टनांहून अधिक सोन्याचा अधिकृत साठा जमा झाला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) सातत्याने सोन्याची खरेदी करत आहे. सोन्याच्या साठ्याच्या बाबतीत भारत आता जगातील पहिल्या १० देशांच्या यादीत आहे.
१० देशांच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक नववा. परकीय चलन साठ्याचा विचार करता, भारताच्या एकूण गंगाजळीतील सोन्याचे मूल्य सुमारे १२१ अब्ज डॉलर्स इतके झाले आहे.
सरकारी साठ्याव्यतिरिक्त, भारतीय कुटुंबांकडे आणि मंदिरांकडे असलेले सोने हे जगातील कोणत्याही देशापेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे.
जागतिक सुवर्ण परिषदेच्या मते, भारतीय घरांमध्ये आणि धार्मिक संस्थांकडे मिळून सुमारे २५,००० टन सोने असू शकते.
आर्थिक अस्थिरतेच्या काळात सोन्याचा साठा देशाला मोठी सुरक्षा प्रदान करतो, म्हणूनच आरबीआय आपली सोन्याची गुंतवणूक वाढवत आहे.
आरबीआयने त्यांचे सोने केवळ भारतातच नव्हे, तर 'बँक ऑफ इंग्लंड' आणि 'बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्स' मध्येही सुरक्षित ठेवले आहे.
गेल्या दोन वर्षांत भारताने आपल्या एकूण परकीय चलन साठ्यातील सोन्याचा वाटा ८ टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.
सोन्याच्या या प्रचंड साठ्यामुळे भारताची आर्थिक स्थिती जागतिक बाजारपेठेत अधिक मजबूत आणि सुरक्षित होण्यास मोठी मदत होते.