Pranali Kodre
जून महिन्यातील तिसरा रविवार हा जगभरात पितृदिन म्हणून साजरा होता.
या दिवशी अनेकजण आपल्या वडिलांबद्दलचं प्रेम व्यक्त करत असतात.
दरम्यान, याच निमित्त अशा सहा पिता-पुत्रांच्या जोडींबद्दल जाणून घेऊ ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्थरावर भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले.
हेमंत कानिटकर यांनी १९७४ मध्ये भारतासाठी २ कसोटी सामने खेळले. तसेच त्यांचा मुलगा हृषिकेश कानिटकर १९९७ ते १९९९ दरम्यान भारतासाठी २ कसोटी आणि ३४ वनडे खेळले.
लाला अमरनाथ यांनी भारतासाठी २४ कसोटी सामने खेळले. तसेच त्यांची मुलं मोहिंदर आणि सुरिंदर अमरनाथ यांनी ही भारताचे प्रतिनिधित्व केले. मोहिंदर यांनी ६९ कसोटी आणि ८५ वनडे खेळले. सुरिंदर हे १० कसोटी आणि ३ वनडे खेळले.
योगराज सिंग यांनी भारतासाठी १ कसोटी आणि ६ वनडे सामने खेळले. त्यांचा मुलगा युवराज सिंग भारतासाठी दीर्घकाळ खेळला. त्याने ४० कसोटी, ३०४ वनडे आणि ५८ टी२० सामने आंतरराष्ट्रीय स्थरावर खेळले.
भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर भारतासाठी १२५ कसोटीआणि १०८ वनडे सामने खेळले. त्यांचा मुलगा रोहन गावसकरही भारताकडून खेळला, पण त्याला ११ वनडेच खेळता आले.
सध्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी हे भारताचे प्रसिद्ध क्रिकेटपटूही राहिले. त्यांनी २७ कसोटी आणि ७२ वनडे सामने खेळले. त्यांचा मुलगा स्टूअर्ट बिन्नीने भारताचे ६ कसोटी, १४ वनडे आणि ३ टी२० सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले.
विजय मांजरेकर यांनी ५५ कसोटी सामने खेळले. त्यांचा मुलगा संजय मांजरेकर देखील भारतासाठी खेळला, ज्याने ३७ कसोटी आणि ७४ वनडे सामने खेळले.
इफ्तिखान अली खान पतौडी हे भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशांसाठी खेळले.त्यांचा मुलगा मन्सूर अली खान पतौडी यांनीही भारताचे प्रतिनिधित्व तर केले, पण २१ व्या वर्षीच ते कर्णधारही बनले