Pranali Kodre
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५ फायनलचं विजेतेपद दक्षिण आफ्रिका संघाने जिंकले आणि तीन दशकांचा आयसीसी विजेतेपदाचा दुष्काळ संपवला.
दक्षिण आफ्रिकेला हे विजेतेपद जिंकून देण्यात फलंदाज एडेन मार्करमचं योगदान मोलाचं ठरलं.
मार्करमने फायनलमध्ये चौथ्या डावात शतक झळकावण्याचा पराक्रम केला. त्यानेच पहिल्या डावात धोकादायक स्टीव्ह स्मिथचीही विकेट घेतली.
दरम्यान, ज्यावेळी त्याने शतक ठोकलं त्यावेळी स्टँडमध्ये त्याची पत्नीही उपस्थित होती, यावेळी तिथे असलेल्या सर्वांनी तिचेही अभिनंदन केले.
मार्करम आणि त्याची पत्नी निकोल डेनिएला ओ'कॉनर हे लहानपणीपासूनचे मित्र. एकाच शाळेत ते होते.
शाळेत असताना मैत्री झाली आणि त्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
एडेन आणि निकोल यांनी जवळपास १० वर्षे एकमेकांना डेट केले. त्यानंतर २२ जुलै २०२३ रोजी त्यांनी लग्न केले.
निकोल नादौरा ज्वेलरी या ब्रँडची मालकीन आहे. तसेच ती वाईन टेस्टर देखील असून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वाईन टेस्ट करून त्याचे रिव्ह्यू देते.
मार्करमला पाठिंबा देण्यासाठी बऱ्याचदा निकोल स्टेडियममध्येही उपस्थित असते.