Aarti Badade
चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, अपुरी झोप आणि ताणतणावामुळे शरीरात फॅट जमा होऊन मद्यपान करणाऱ्या आणि न करणाऱ्या दोघांनाही 'फॅटी लिव्हर'चा आजार होऊ शकतो.
Fatty Liver Symptoms and Diet
Sakal
पोटाच्या वरच्या उजव्या भागात वारंवार वेदना होणे किंवा त्या जागी सतत जडपणा जाणवणे हे फॅटी लिव्हरचे सर्वात मुख्य सुरुवातीचे लक्षण आहे.
Fatty Liver Symptoms and Diet
Sakal
दिवसभरात अजिबात भूक न लागणे किंवा अचानक झपाट्याने वजन कमी होणे किंवा वेगाने वाढणे हे लिव्हरच्या बिघडलेल्या कार्याचा थेट संकेत असू शकते.
Fatty Liver Symptoms and Diet
Sakal
शरीरातील अस्वस्थतेसोबतच जर तुमचे डोळे किंवा त्वचेचा रंग पिवळा पडू लागला, तर हे फॅटी लिव्हरचे अत्यंत गंभीर लक्षण असून याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.
Fatty Liver Symptoms and Diet
Sakal
रात्रीची झोप पूर्ण झाल्यानंतर किंवा दिवसभरात विश्रांती घेतल्यानंतरही शरीरात सतत अशक्तपणा आणि थकवा जाणवणे हे फॅटी लिव्हरचे सामान्य लक्षण आहे.
Fatty Liver Symptoms and Diet
Sakal
लिव्हरचे रक्षण करण्यासाठी आहारात ओमेगा-३ युक्त अक्रोड, बदाम, प्रोटीनसाठी पनीर, उकडलेली अंडी, ग्रीक योगर्ट आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा.
Fatty Liver Symptoms and Diet
Sakal
ही लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या, अतिमद्यपान त्वरित थांबवा, तळलेले-मसालेदार पदार्थ टाळा आणि व्यायामाद्वारे तुमचे वजन नियंत्रणात ठेवा.
Fatty Liver Symptoms and Diet
Sakal
Surya Namaskar Calories Burned
Sakal