Aarti Badade
झोपताना अचानक 'पडल्यासारखे' वाटणे किंवा दचकून जाग येणे याला 'हायप्निक जर्क' म्हणतात. हा एक सामान्य अनुभव आहे.
शरीराचे स्नायू शिथिल होत असताना मेंदूला चुकीचा संदेश मिळाल्यास किंवा तणावामुळे असे वाटू शकते.
झोपताना मेंदू आणि स्नायूंमध्ये थोडासा समन्वय बिघडल्यास पडल्यासारखे वाटू शकते.
दिवसभराचा ताण किंवा चिंता यामुळेही झोपेत अचानक दचकून जाग येऊ शकते.
शरीरात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि आयर्नची (लोह) कमतरता असल्यास झोपेच्या समस्या वाढू शकतात.
अनियमित वेळापत्रक, अपुरी झोप किंवा जास्त कॅफीनचे सेवन हे देखील एक कारण असू शकते.
दररोज एकाच वेळी झोपण्याची आणि उठण्याची सवय लावा. यामुळे झोपेचे चक्र नियमित राहते.
रात्री शांत झोप लागण्यासाठी खोलीत पूर्ण अंधार आणि शांतता असणे आवश्यक आहे.
झोपण्याच्या अगदी जवळ व्यायाम करणे टाळा. संध्याकाळी लवकर व्यायाम करणे चांगले.
दिवसा जास्त वेळ झोपल्यास रात्री झोपायला त्रास होऊ शकतो आणि 'हायप्निक जर्क'चा अनुभव येऊ शकतो.
जर तुम्हाला वारंवार झोपेत दचकल्यासारखे वाटत असेल किंवा झोपेच्या इतर गंभीर समस्या असतील, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.