Aarti Badade
दैनंदिन दुखण्यांवर हळदीचे अनेक घरगुती उपाय आहेत.
हळद, लसूण आणि गूळ एकत्र करा. जिथे मुकामार लागला असेल, तिथे हे मिश्रण लावा. दुखण्यात लगेच आराम मिळतो.
हळद आणि काळे मीठ एकत्र करून लेप तयार करा. मुरगळलेल्या किंवा सूज आलेल्या भागावर लावा. सूज कमी होते आणि वेदना थांबतात.
हळद, कणीक आणि तेल गरम करा. मुरगळलेल्या जागेवर या मिश्रणाची पट्टी बांधा. हा एक आरामदायक आणि नैसर्गिक उपचार आहे.
हळद ही स्नायूंच्या वेदनांवर अंतर्गत आणि बाह्य दोन्ही प्रकारे प्रभावी आहे.
हळद आणि गूळ लिंबाच्या रसात मिसळा. शरीराच्या कोणत्याही भागातील मुकामार लवकर बरा होतो.
हळद गरम दुधात टाकून नियमित प्या. सांधेदुखी आणि शरीरातील जळजळ कमी होते.
हळदीचा लेप रात्री झोपताना लावल्यास खूप फायदा होतो. सूज आणि वेदना रात्रीतूनच कमी होतात.
हळद आणि नारळाचे तेल गरम करून लावा. हे त्वचेच्या आतपर्यंत जाऊन उपचार करते.