Aarti Badade
जेवणानंतर थकवा येणे ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी काही अन्नपदार्थ यामागे कारणीभूत असतात.
परिष्कृत कार्ब्स खाल्ल्याने साखर झपाट्याने वाढते आणि लगेच कमी होते, यामुळे थकवा आणि झोप येते.
चॉकलेट, मिठाई खाल्ल्यावर तात्पुरती ऊर्जा मिळते, पण नंतर अती थकवा जाणवतो.
सोडा, एनर्जी ड्रिंकमधील कॅफिन आणि साखर थोडावेळ ऊर्जा देतात, पण नंतर झोप आणि थकवा दुप्पट होतो.
जास्त चरबीयुक्त अन्न पचवायला वेळ लागतो, त्यामुळे शरीर जास्त थकते आणि झोप येते.
मर्यादेपेक्षा अधिक खाल्ल्यास संपूर्ण रक्तप्रवाह पचनासाठी वळतो, मेंदूत ऑक्सिजन कमी पोहोचतो आणि डोळे लागतात.
पचन क्रियेमुळे मेंदूपर्यंत रक्ताचा प्रवाह कमी होतो, यामुळेही सुस्ती जाणवते.
स्मार्ट आणि संतुलित आहार घ्या — ज्यामध्ये फायबर, प्रथिने आणि कमी साखर असलेले पदार्थ असावेत.
दुपारी हलका आहार घ्या, साखर आणि फॅट कमी करा, आणि थोडीशी चालणे झोप टाळू शकते.
दिवसातील ऊर्जा टिकवायची असेल तर जेवणात बदल गरजेचे — कारण खाणं झोप आणतंय की ताकद देतंय, हे तुम्हीच ठरवा!