Anushka Tapshalkar
बऱ्याचदा दुपारचे जेवण केले की आपल्याला सुस्ती येते किंवा काम करायचा कंटाळा येतो.
दररोज दुपारी २०-३० मिनिटांची झोप फायदेशीर असते, ज्यामुळे आपल्याला ताजतवाने वाटते. परंतु दुपारी येणारी सुस्ती ही झोप नसते.
दुपारी जेवणांतर थकवा येणे, कामात लक्ष न लागणे ही दुपारच्या सुस्तीची लक्षणे असू शकतात.
दुपारची सुस्तीची अनेक कारणे असू शकतात ,जसेकी चुकीचा आहार, अतिरिक्त साखर आणि प्रक्रिया केलेले पदार्थ यांचे सेवन तसेच शरीराला योग्य पोषण न मिळणे .
पौष्टिक आणि घरगुती आहाराचा समावेश केल्याने शरीराला आवश्यक पोषण मिळते.
न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये, दुपारच्या आहारात २ पदार्थांचा आवर्जून समावेश करायला सांगितला आहे.
त्यापैकी एक म्हणजे तूप. दुपारच्या जेवणात तूपाचा वापरल्यास पचन उत्तम होत आणि दीर्घकाळ ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. यामुळे मेंदू अधिक कार्यक्षम राहतो आणि शरीर ताजेतवाने वाटते असे त्या म्हणाल्या.
ऋजुता दिवाकरांच्या मते जेवणात आवर्जून वापरावा असा दुसरा पदार्थ म्हणजे पारंपरिक चटण्या. चटण्या फायबर आणि सूक्ष्मपोषकांनी भरपूर असल्यामुळे पचनशक्ती सुधारते. त्याचबरोबर, त्या चविष्ट असल्याने आहार पोषणमूल्यांनी परिपूर्ण आणि अधिक रुचकर होतो.
या दोघांचा आहारात समावेश केल्याने अन्नाचे योग्य प्रकारे विघटन होते आणि जेवण संतुलित राहते, ज्यामुळे शरीराला सर्व आवश्यक पोषक तत्त्वे मिळतात.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.