Aarti Badade
सुक्या मेव्याचा आहारात समावेश केल्याने शरीराला भरपूर पोषण मिळतं. टायगर नट्स हे त्यातीलच एक शक्तिशाली पण कमी प्रसिद्ध ड्रायफ्रूट आहे.
टायगर नट्स (Tiger Nuts) म्हणजे स्वादिष्ट आणि पौष्टिक सुका मेवा, जो काजू-बदामाइतकाच फायदेशीर आहे. त्यात फायबर, हेल्दी फॅट्स आणि महत्त्वाची जीवनसत्त्वं असतात.
टायगर नट्स खाल्ल्याने शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते. त्यामुळे थकवा कमी होतो आणि दिवसभर ताजेतवाने वाटतं.
या नट्समध्ये भरपूर फायबर असल्याने पोट भरलेलं वाटतं. वारंवार भूक लागत नाही आणि चयापचय वाढतो — ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
हेल्दी फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्समुळे टायगर नट्स हृदयासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतो.
फायबरमुळे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. रोजच्या आहारात थोडा टायगर नट घ्या.
टायगर नट्समध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेला तजेलदार आणि निरोगी ठेवतात. वृद्धत्वाची लक्षणं कमी होतात.
हे नट्स फ्री-रॅडिकल्सपासून शरीराचं रक्षण करतात. त्यामुळे त्वचेवर वयोमानानुसार होणारे बदल उशिरा येतात.
या माहितीचा उपयोग करताना डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, विशेषतः तुम्ही औषधे घेत असाल किंवा आरोग्य समस्या असतील तर.