Aarti Badade
मेथीची भाजी किंवा मेथीचे दाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. परंतु, काही विशिष्ट आजार किंवा औषधे सुरू असणाऱ्या व्यक्तींसाठी मेथीचे अतिसेवन धोकादायक ठरू शकते.
Side effects of eating fenugreek these people aviod
Sakal
मेथी नैसर्गिकरित्या रक्तातील साखर कमी करते. जर तुम्ही इन्सुलिन किंवा मधुमेहाच्या इतर गोळ्या घेत असाल आणि सोबतीने मेथी जास्त खाल्ली, तर शुगर प्रमाणापेक्षा जास्त कमी होऊ शकते.
Side effects of eating fenugreek these people aviod
Sakal
मेथीमध्ये रक्ताभिसरण सुधारण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे ॲस्पिरिन किंवा वॉरफेरिन सारखी रक्त पातळ करणारी औषधे सुरू असताना मेथी खाल्ल्यास अंतर्गत रक्तस्त्रावाचा धोका वाढतो.
Side effects of eating fenugreek these people aviod
Sakal
मेथीमुळे रक्तदाब कमी होतो, त्यामुळे ज्यांचे बीपी आधीच कमी असते त्यांनी मेथी खाणे टाळावे. तसेच, वारंवार जुलाब, गॅस किंवा तीव्र ॲसिडिटीचा त्रास असणाऱ्यांनी मेथीचे अतिसेवन करू नये.
Side effects of eating fenugreek these people aviod
Sakal
गरोदरपणात मेथीचे अतिप्रमाणात सेवन केल्यास शरीरात हार्मोनल असंतुलन किंवा पचनाच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे गरोदर महिलांनी मेथी मर्यादित खावी.
Side effects of eating fenugreek these people aviod
Sakal
मेथीसोबत दही किंवा इतर आंबट पदार्थ एकत्र करून खाल्ल्यास पचनात जडपणा येतो. यामुळे अनेक जणांना पोट फुगणे, गॅस होणे किंवा छातीत जळजळ होण्याचा त्रास होऊ शकतो.
Side effects of eating fenugreek these people aviod
Sakal
Shahi Matar Paneer Recipe
Sakal